
Pune Bus Rape Case । पुण्यातील स्वारगेट एसटी डेपो परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. सोमवारी सकाळी 5.30 वाजता एका तरुणीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार करण्यात आला. पीडित तरुणी फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकावर थांबली होती. यावेळी आरोपीने गोड बोलून तिच्याशी ओळख केली आणि तिला विश्वासात घेतले. त्याने तिला सांगितले की सातारची बस इथे थांबत नाही, आणि ती त्याला बस कुठे लागते हे दाखवण्याच्या बहाण्याने घेऊन गेला.
Congress । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! काँग्रेसच्या बड्या नेत्याला जन्मठेपेची शिक्षा
बसमध्ये अंधार पाहून पीडित तरुणीने आरोपीला विचारले, तेव्हा आरोपीने तिला सांगितले की ही रात्रीची उशिराची बस आहे, म्हणून लाईट बंद आहेत. त्यानंतर पीडितेने मोबाईल टॉर्च लावून पाहायला सुरूवात केली, तेव्हा आरोपीने बसचा दरवाजा बंद करून तिच्यावर अत्याचार केला.
या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून, पुणे पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी 13 पथकं तैनात केली आहेत. पोलिसांनी आरोपीची ओळख सीसीटीव्ही फुटेज आणि पीडितेच्या दिलेल्या माहितीवरून पटवली आहे. आरोपीचे नाव दत्तात्रय रामदास गाडे आहे, जो एक हिस्ट्रीशीटर आहे आणि त्याच्यावर चोरी, दरोडेखोरी, चेन स्नॅचिंग सारख्या गुन्ह्यांचे आरोप आहेत.
Gaja Marne | सर्वात मोठी बातमी! कुख्यात गुंड गजा मारणे आईसोबत पोलीस ठाण्यात शरण
पोलिसांनी आरोपीबद्दल माहिती देणाऱ्याला 1 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी त्याच्या राहत्या ठिकाणी धाड टाकली, मात्र तो फरार आहे.
IND vs PAK । रोहितचा इशारा आणि विराटने पूर्ण केली इच्छा, शतक पूर्ण करत भारताला विजय मिळवून दिला