
Pune News | पुण्यातील स्वारगेट बस स्थानक परिसरात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना मंगळवारी पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे.
IND vs PAK । रोहितचा इशारा आणि विराटने पूर्ण केली इच्छा, शतक पूर्ण करत भारताला विजय मिळवून दिला
पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी असलेल्या CCTV फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटली आहे. संशयित आरोपी दत्तात्रय गाडे हा शिरूर परिसरातील आहे, आणि त्याच्यावर यापूर्वी शिक्रापूर आणि शिरूर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी आठ पथके तैनात केली असून, डॉग स्कॉडच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली आहे.
Congress । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! काँग्रेसच्या बड्या नेत्याला जन्मठेपेची शिक्षा
घटनेच्या तपशिलानुसार, पीडित तरुणी फलटण येथे जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकावर थांबली होती. आरोपीने तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिच्या विश्वासात घुसून तिला जवळच्या शिवशाही बसमध्ये नेले. बसमध्ये अंधार असल्याचे पाहून, पीडितेने विचारले की लाईट बंद का आहेत, त्यावर आरोपीने सांगितले की बस रात्री उशिराची असल्याने लाईट बंद आहेत. पीडितेने मोबाईल टॉर्च लावून पाहायला सुरूवात केली, तेव्हा आरोपीने बसचा दरवाजा बंद करून तिच्यावर अत्याचार केला.
Gaja Marne | सर्वात मोठी बातमी! कुख्यात गुंड गजा मारणे आईसोबत पोलीस ठाण्यात शरण
आरोपी दत्तात्रय गाडे हा पूर्वीचा रेकॉर्ड असलेला गुन्हेगार आहे. त्याच्यावर चेन स्नॅचिंग आणि अन्य गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत. पोलिसांनी त्याच्या राहत्या घरी धाड टाकली, पण तो तेथे सापडला नाही. महिला सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, कारण स्वारगेट बस स्थानक पुण्यातील सर्वाधिक गर्दीचे आणि सुरक्षित मानले जाणारे ठिकाण आहे.
Chhaava Box Office Collection । ‘छावा’ सिनेमाची घोडदौड सुरूच! आठव्या दिवशीची कमाई ऐकून व्हाल थक्क