
Gaja Marne | पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे (वय 57) याच्यावर पोलिसांनी ‘मोक्का’ (MCOCA) अंतर्गत कारवाई केली आहे. गजा मारणे आणि त्याच्या टोळीने 19 फेब्रुवारी रोजी कोथरूड परिसरात आयटी अभियंत्याला बेदम मारहाण केली होती. या घटनेनंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या निर्देशानुसार गुंड गजा मारणे आणि त्याच्या टोळीविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई केली.
Chhaava Box Office Collection । ‘छावा’ सिनेमाची घोडदौड सुरूच! आठव्या दिवशीची कमाई ऐकून व्हाल थक्क
पोलीस कारवाईचा इशारा दिल्यानंतर गजा मारणे आईसोबत कोथरूड पोलिस ठाण्यात शरण आला. त्याला अटक करण्यात आली असून, त्याच्या टोळीतील इतर आरोपींचा शोध सुरू आहे. शहरात दहशत निर्माण करणाऱ्या या टोळीला नेस्तनाबूत करण्यासाठी पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे.
IND vs PAK । रोहितचा इशारा आणि विराटने पूर्ण केली इच्छा, शतक पूर्ण करत भारताला विजय मिळवून दिला
यापूर्वी पोलिसांनी ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू (35), किरण कोंडिबा पडवळ (31), आणि अमोल विनायक तापकीर (39) यांना अटक केली होती. तर, गजा मारणेचा भाचा श्रीकांत ऊर्फ बाब्या संभाजी पवार अद्याप फरार आहे. पोलिसांनी गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांच्या घरांवर झाडाझडती घेऊन 74 ठिकाणी तपास सुरू केला आहे. या कारवाईने पुण्यातील गुंडगिरीच्या रांगड्या कारवायांना धक्का बसला असून, पोलिसांनी सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
Accident News । हातात फक्त हॉल तिकीट राहिलं, दहावीच्या परीक्षेपूर्वी विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू