
Dattatraya Gade । पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर झालेल्या तरुणीवरील बलात्कार प्रकरणात फरार झालेल्या आरोपी दत्तात्रय गाडेची अटक अखेर 48 तासांच्या शोधानंतर पोलिसांनी केली. दत्तात्रय गाडे शिरूर येथील गुनाट गावातील एका शेतात लपलेला होता. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी 13 पथकं तयार केली होती आणि त्याच्या शोधासाठी डॉग स्क्वॉड आणि ड्रोनचा वापर करण्यात आला. अखेर त्याचे लोकेशन ट्रेस झाल्यानंतर गावात 100 पोलिसांची तैनाती केली होती, त्यामुळे आरोपी पळून जाऊ शकला नाही.
Congress । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! काँग्रेसच्या बड्या नेत्याला जन्मठेपेची शिक्षा
दत्तात्रय गाडे याची अटक करण्यासाठी पोलिसांनी अनेक तास शोध मोहीम सुरू केली होती. रात्री 11:45 वाजता, गाडे एका घरात पाणी पिण्यासाठी गेला, त्यावेळी घरातील महिलेला त्याची ओळख पटली आणि तिने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्वरित 30 मिनिटांच्या आत चारही बाजूंनी गाडे याला घेरले आणि ड्रोनद्वारे त्याला बाहेर येण्याची चेतावणी दिली. आरोपी कॅनालच्या खड्ड्यात लपला होता, मात्र पोलिसांच्या सुसंगठित कार्यामुळे त्याला पकडण्यात यश आले. मध्यरात्री 1:20 च्या सुमारास पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.
गुनाट गावातील ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला अटक केली. या अटकेनंतर पोलिसांनी आरोपीला लष्कर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये आणले आहे. आज सकाळी 11 वाजता आरोपीला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
Gaja Marne | सर्वात मोठी बातमी! कुख्यात गुंड गजा मारणे आईसोबत पोलीस ठाण्यात शरण