
Congress । दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने 1984 मध्ये घडलेल्या शीख विरोधी दंगलप्रकरणी काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 41 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणात दोषी ठरलेल्या सज्जन कुमार यांच्या विरोधात न्यायालयाने कठोर निर्णय घेतला आहे. 1984 मध्ये 1 नोव्हेंबर रोजी सरस्वती विहार येथे शीख समुदायावर जमावाने हल्ला केला होता. या हिंसाचारात जसवंत सिंह आणि त्यांचा मुलगा तरुणदीप सिंह यांना जिवंत जाळले गेले होते. जमावाने त्यांच्या घरात घुसून हत्या केली आणि घर लुटून जाळून टाकले.
IND vs PAK । रोहितचा इशारा आणि विराटने पूर्ण केली इच्छा, शतक पूर्ण करत भारताला विजय मिळवून दिला
सुनावणीदरम्यान न्यायालयाने सज्जन कुमार यांचा सहभाग गंभीर मानला. न्यायालयाने म्हटले की, सज्जन कुमार केवळ जमावाचा भाग नव्हते, तर त्यांनी त्या हिंसक जमावाचे नेतृत्व केले होते. या दंगलीत सामूहिक नरसंहार झाला होता, अशी याचिकाकर्त्यांची भूमिका होती.
Chhaava Box Office Collection । ‘छावा’ सिनेमाची घोडदौड सुरूच! आठव्या दिवशीची कमाई ऐकून व्हाल थक्क
1984 शीख विरोधी दंगलप्रकरणी सुरुवातीला पंजाबी बाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. नंतर विशेष तपास पथकाने या प्रकरणाचा तपास केला. 2021 मध्ये न्यायालयाने सज्जन कुमार यांच्यावर आरोप निश्चित केले होते. न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या दंगलीत अनेक लोक मारले गेले होते आणि शीख कुटुंबांवर जिवंत जाळणे, मालमत्तेची नासधूस करणे आणि अत्याचार करण्याचे गंभीर आरोप होते.
Accident News । हातात फक्त हॉल तिकीट राहिलं, दहावीच्या परीक्षेपूर्वी विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू