IND vs PAK । रोहितचा इशारा आणि विराटने पूर्ण केली इच्छा, शतक पूर्ण करत भारताला विजय मिळवून दिला

IND vs PAK

IND vs PAK । विराट कोहलीने आपल्या दमदार फॉर्ममध्ये परत येण्याची इच्छा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पूर्ण केली. दुबईतील चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील या सामन्यात विराटने 111 चेंडूत 100 धावांची नाबाद खेळी केली आणि भारताला पाकिस्तानवर सहा गडी राखून विजय मिळवून दिला. सामन्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये विराटच्या शतकासाठी सस्पेन्स निर्माण झाला होता.

Accident News । हातात फक्त हॉल तिकीट राहिलं, दहावीच्या परीक्षेपूर्वी विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू

भारताला विजयासाठी कमी धावा लागल्यामुळे विराटचे शतक हुकतं की काय अशी भीती दर्शकांच्या मनात होती. 43व्या षटकात भारताला चार धावांची आवश्यकता होती आणि विराटला शतकासाठी पाच धावा हव्या होत्या. विराटने एकेरी घेत शेवटच्या क्षणांमध्ये चांगली स्थिति निर्माण केली, पण त्याच्या शतकावर थोडा सस्पेन्स होता. यावेळी ड्रेसिंग रूममधून रोहित शर्मा विराटला एक इशारा देत सिक्स मारण्याचा सूचक इशारा देत होता.

Chhaava Box Office Collection । ‘छावा’ सिनेमाची घोडदौड सुरूच! आठव्या दिवशीची कमाई ऐकून व्हाल थक्क

विराटने नंतर खुशदिल शाहच्या बॉलवर चौकार मारत भारताला विजय मिळवला आणि एकाच वेळी त्याचं 51व शतकही पूर्ण केलं. विजयाच्या आनंदात विराटचा चेहरा चमकला आणि त्याने पॅव्हेलियनकडे इशारा करत “मैं हूं ना.. रिलॅक्स” असं म्हटलं, ज्यामुळे रोहितच्या चेहऱ्यावर हसू आलं. त्यांच्या या इशारेबाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Sourav Ganguly । ब्रेकिंग! सौरभ गांगुलीच्या कारचा अपघात, थोडक्यात वाचला माजी क्रिकेटर

हा क्षण भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी एक ऐतिहासिक ठरला, कारण विराटच्या शतकाने केवळ भारताला विजय मिळवून दिला नाही, तर त्याने आपल्या फॉर्ममध्ये परत येण्याचा संदेशही दिला.

Spread the love