
Pratap Sarnaik । महिलांना अर्ध्या तिकिटात एसटी बसमधून राज्यभर प्रवास करण्याची सुविधा मिळाली आहे. तसेच 65 वर्षांवरील नागरिकांना अर्ध्या तिकिटात आणि 75 वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवास करण्याची सुविधा मिळाली आहे. विद्यार्थ्यांसाठी देखील एसटीच्या प्रवासासाठी पास प्रणालीचा लाभ मिळतो. त्यामुळे एसटीचे प्रवासी वाढले आहेत, पण एसटी महामंडळाला सध्या आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, मोफत प्रवास योजना बंद होईल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती.
IND vs PAK । रोहितचा इशारा आणि विराटने पूर्ण केली इच्छा, शतक पूर्ण करत भारताला विजय मिळवून दिला
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावर मोठा खुलासा केला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, एसटी बसच्या मोफत प्रवासाच्या निर्णयाला थांबवण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही. एसटी बसला सर्वसामान्यांची लाईफलाईन मानले जात असून, त्याच्या माध्यमातून प्रवाशांना सुरक्षित आणि स्वस्त प्रवासाची सुविधा मिळत आहे. त्यामुळे, मोफत प्रवास बंद करण्याचा निर्णय घेतला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.
Chhaava Box Office Collection । ‘छावा’ सिनेमाची घोडदौड सुरूच! आठव्या दिवशीची कमाई ऐकून व्हाल थक्क
याशिवाय, सरनाईक यांनी डिजिटल बोर्ड लावण्याच्या संदर्भात देखील प्रतिक्रिया दिली. त्यानुसार, एसटी महामंडळाला विश्वासात न घेतल्याने माहिती व जनसंपर्क विभागाची प्रक्रिया चुकीची होती. टेंडर प्रक्रिया थांबवण्यास आम्ही सूचना दिल्या आहेत, असे ते म्हणाले. कर्नाटकमध्ये बसवर हल्ला झाल्याच्या घटनेवरही सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आणि अस्मितेवर हल्ला करणे चुकीचे असल्याचे म्हटले.
Accident News । हातात फक्त हॉल तिकीट राहिलं, दहावीच्या परीक्षेपूर्वी विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू