Chhaava Box Office Collection । ‘छावा’ सिनेमाची घोडदौड सुरूच! आठव्या दिवशीची कमाई ऐकून व्हाल थक्क

chava Movie

Chhaava Box Office Collection । लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने आठव्या दिवशी २३ कोटी रुपयांची कमाई केली, ज्यामुळे त्याची एकूण कमाई २४२.२५ कोटी रुपये झाली आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदानाच्या जोरदार अभिनयाने हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडत आहे.

Sourav Ganguly । ब्रेकिंग! सौरभ गांगुलीच्या कारचा अपघात, थोडक्यात वाचला माजी क्रिकेटर

‘छावा’ सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून दररोजच्या कमाईत वाढ होत आहे. या चित्रपटाने ८ दिवसांत बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. ‘छावा’ सिनेमा रिलीज होऊन आठ दिवस उलटले असताना, त्याच्या कमाईत अजूनही घट होत नाहीये. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने पहिले सात दिवस कमाई केली आणि आठव्या दिवशी २३ कोटी रुपये मिळवले.

Manikrao Kokate । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा, मंत्रीपदावर संकट

‘छावा’ने ‘जवान’, ‘पठाण’, ‘पुष्पा’ यासारख्या मोठ्या सिनेमांनाही मागे टाकले आहे. यामुळे चित्रपट इंडस्ट्रीत चर्चा सुरु झाली आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदानाच्या दमदार अभिनयासोबत अक्षय खन्नाच्या भूमिकेचीही प्रशंसा केली जात आहे. या सिनेमा ने ७ इतर सिनेमांना टक्कर दिली आहे, ज्यात कंगना रणौतचा ‘इमर्जन्सी’, जुनैद खानचा ‘लवयापा’, आणि अक्षय कुमारचा ‘स्कायफोर्स’ यांचा समावेश आहे. आतापर्यंत ‘छावा’ने ३०० कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे, आणि आगामी काळात आणखी विक्रमी कमाईची अपेक्षा आहे.

Accident News । हातात फक्त हॉल तिकीट राहिलं, दहावीच्या परीक्षेपूर्वी विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू

Spread the love