Odisha News । सध्या ओडिशातून एक मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. ओडिशातील झारसुगुडा जिल्ह्यात शुक्रवारी (19 एप्रिल) संध्याकाळी एक मोठी दुर्घटना घडली. एका बोटीतून 50 हून अधिक लोक प्रवास करत होते ती बोट महानदीत उलटली असून मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून तिचा मृतदेहही सापडला आहे. त्याचबरोबर 3 मुलांसह 7 लोक अद्याप बेपत्ता आहेत. यामुळे त्या ठिकाणी एकच खळबळ उडाली आहे.
Ajit Pawar । उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निवडणूक सभेत सर्वात मोठे आव्हान; म्हणाले…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बोट पाथरसेनी कुडा येथून बरगड जिल्ह्यातील बांजीपल्लीकडे जात होती. त्यात 50 हून अधिक लोक होते. झारसुगुडा जिल्ह्यातील रेंगाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शारदा घाटावर बोट उलटली.
Ajit Pawar । अजित पवारांच्या भाषणादरम्यान माजी आमदाराला आली भोवळ, तातडीने रुग्णालयात दाखल
शुक्रवारी सायंकाळीच घटनास्थळी उपस्थित मच्छिमारांनी 35 जणांना पाण्यातून बाहेर काढले होते. माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि आणखी 7 जणांना बाहेर काढले. बचाव पथकाने सांगितले की, शनिवारी सकाळपर्यंत 47-48 जणांना वाचवण्यात यश आले आहे. एका महिलेचा मृतदेह सापडला आहे.
Chhagan Bhujbal। बिग ब्रेकिंग! छगन भुजबळांची लोकसभेतुन माघार