Ajit Pawar । उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निवडणूक सभेत सर्वात मोठे आव्हान; म्हणाले…

Ajit Pawar

Ajit Pawar । महाराष्ट्रातील 5 जागांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी (19 एप्रिल) संपले. उर्वरित जागांवर होणाऱ्या निवडणुकीसाठी पक्षांची प्रचार मोहीम जोरात सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (19 एप्रिल) उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील (Osmanabad Lok Sabha Constituency) मतदारांना NDA उमेदवाराच्या समर्थनार्थ मतदान करण्याचे आवाहन केले.

Ajit Pawar । अजित पवारांच्या भाषणादरम्यान माजी आमदाराला आली भोवळ, तातडीने रुग्णालयात दाखल

राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ आयोजित रॅलीला संबोधित करताना अजित पवार म्हणाले की, पंतप्रधान मोदींचे (Prime Minister Modi) हात बळकट करणाऱ्या उमेदवारालाच पाठिंबा द्या. पीटीआयच्या वृत्तानुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करणाऱ्या उमेदवाराला मत दिल्यास विकासाला चालना मिळेल, असे आवाहन केले आहे.

Chhagan Bhujbal। बिग ब्रेकिंग! छगन भुजबळांची लोकसभेतुन माघार

त्याचबरोबर पुढे बोलताना ते म्हणाले, “पंतप्रधान मोदींनी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. कृपया आमच्या पंतप्रधानांना पाठिंबा देणाऱ्या उमेदवाराला निवडून द्या.” सध्या त्यांच्या वक्तव्याची सगळीकडे चर्चा सुरु आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी देखील त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

Loksabha election । ठाकरे गटाला मोठा धक्का, निवडणुकीपूर्वीच बड्या नेत्याने केली राजकीय निवृत्तीची घोषणा

Spread the love