Ajit Pawar । त्यावेळी नेमकं काय ठरलं होत? 2019 च्या पहाटेच्या शपथविधीबाबात पहिल्यांदाच अजित पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

Ajit pawar

Ajit Pawar । लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला आहे. अनेक बडे नेते ठीक ठिकाणी सभा घेऊन प्रचार करताना दिसत आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार देखील आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा प्रचार करताना दिसत आहेत. इंदापूर (Indapur) या ठिकाणी अजित पवार यांनी पत्नी तथा बारामतीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या निमित्ताने एक कार्यक्रम गौप्यस्फोट केला आहे. (PoliticsNews )

Ajit Pawar । उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निवडणूक सभेत सर्वात मोठे आव्हान; म्हणाले…

याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, “देशातील एक नंबरच्या उद्योगपतींच्या घरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मी, त्याचबरोबर केंद्रीय मंत्री शरद पवार आणि खासदार प्रफुल पटेल आम्ही एकत्र बसायचो. यावेळी आमच्यामध्ये भाजप सोबत जाण्याची पाच ते सहा वेळा चर्चा झाली. कोणाला मंत्रीपद द्यायचं हे ठरलं. मात्र मुंबईत आल्यानंतर वरिष्ठांनी हा निर्णय बदलला. त्यानंतर अमित शहा यांचा मला फोन आला तुम्ही शब्द दिला तो तुम्हाला पाळावा लागेल. त्यावेळी मी शब्दाचा पक्का होतो. मी शपथ घेतली मात्र नंतर ते सरकार टिकू शकल नाही असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला आहे.

Ajit Pawar । अजित पवारांच्या भाषणादरम्यान माजी आमदाराला आली भोवळ, तातडीने रुग्णालयात दाखल

त्याचबरोबर यावेळी बोलताना अजित पवार यांनी भाजपला शिस्तीचा पक्ष म्हटला आहे. ते म्हणाले, “भाजप हा शिस्तीचा पक्ष आहे. एक काम झालं की दुसरं काम ते झालं की तिसरे काम.. शिस्त म्हणजे शिस्त आरएसएसची त्यांना शिकवण आहे. पंतप्रधान मोदी साहेबांच्या डोक्यात नेहमी देशाचा विकास असतो. मोदी निवडून आले की संविधान बदलतील अशा थापा मारल्या जातात.” असे देखील अजित पवार म्हणाले आहेत.

Chhagan Bhujbal। बिग ब्रेकिंग! छगन भुजबळांची लोकसभेतुन माघार

Spread the love