Chhagan Bhujbal। बिग ब्रेकिंग! छगन भुजबळांची लोकसभेतुन माघार

Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal। मागील अनेक दिवसांपासून महायुतीच्या नाशिकच्या जागेबाबत सस्पेन्स पहायला मिळत आहे. या जागेवर नाशिकचे शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) हे दावा करत होते. तर दुसरीकडे अजित पवार गटाकडूनही या जागेवर दावा केला जात होता. अशातच या प्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. (Latest marathi news)

Loksabha election । ठाकरे गटाला मोठा धक्का, निवडणुकीपूर्वीच बड्या नेत्याने केली राजकीय निवृत्तीची घोषणा

अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनी आज पत्रकार परिषद घेतली. “आपल्याला महायुतीच्या दिग्गजांकडून नाशिकच्या जागेसाठी आग्रह करण्यात आला. तरीही याबाबत खुप चर्चा झाल्यानंतर उमेदवार अधिकृतपणे जाहीर झाला नाही त्यामुळे आपण माघार घेत आहे,” असे भुजबळ यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नाशिकच्या जागेबाबतचा सस्पेन्स आणखी वाढला आहे.

Ajit Pawar । अजित पवारांना निवडणूक आयोगाचा मोठा दणका, ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी होणार चौकशी

“मी याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शाहनिशा करण्यासाठी विचारलं. तर ते म्हणाले की, केंद्रातून तुम्हाला उभं राहण्यास सांगितलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मी होतो तिथे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी तसं सांगितलं आहे. पण चर्चा होउनही अधिकृत उमेदवार जाहीर झाला नाही. महायुतीने आपला कोणताही उमेदवार जाहीर करावा. आपण माघार घेत आहे, असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं.

Sharad Pawar । शरद पवारांनी रात्रीत बदलली समीकरण, ‘हा’ बडा नेता हाती घेणार तुतारी

Spread the love