Salman Khan । धक्कादायक! गँगस्टर लॉरेन्सच्या नावाने बुक केलेली कॅब सलमान खानच्या घरी पोहोचली, पुढे घडलं असं की…

Salman Khan

Salman Khan । कारागृहात बंद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने कॅब बुक करून ती बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे भागातील निवासस्थानी पाठवल्याप्रकरणी गाझियाबादच्या एका रहिवासीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी शुक्रवारी सांगितले की आरोपी रोहित त्यागीला त्याच्या गावी पकडण्यात आले. त्यागीच्या म्हणण्यानुसार, त्याने हे प्रँक करण्यासाठी केले.

Odisha News । भयानक दुर्घटना! ५० लोकांना घेऊन जाणारी बोट नदीत बुडाली; अनेकजण बेपत्ता

पोलिसांनी सांगितले की, बुधवारी त्यागीने सलमान खानचे निवासस्थान गॅलेक्सी अपार्टमेंट ते वांद्रे पोलिस स्टेशनपर्यंत ऑनलाइन कॅब बुक केली. यानंतर, कॅब चालक त्या पत्त्यावर पोहोचल्यावर, ही एक खोड असल्याचे त्याच्या लक्षात आले आणि त्यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली.

Ajit Pawar । त्यावेळी नेमकं काय ठरलं होत? 2019 च्या पहाटेच्या शपथविधीबाबात पहिल्यांदाच अजित पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर गोळीबार

या घटनेची गांभीर्याने दखल घेत वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यागीचा शोध घेतला. त्यांनी त्यागीला आयपीसी कलम ५०५ आणि २९० अंतर्गत अटक केली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर मोटारसायकलस्वाराने गोळीबार केल्याने बिश्नोई रविवारी चर्चेत आला.

Delhi Bus Video । बसमध्ये बिकिनी घालून चढली महिला; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच उडाली खळबळ

Spread the love