Ajit Pawar । अजित पवारांच्या भाषणादरम्यान माजी आमदाराला आली भोवळ, तातडीने रुग्णालयात दाखल

Ajit Pawar । बारामतीत महायुतीकडुन सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कालच त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलीच कंबर कसली आहे. अशातच अजित पवारांच्या भाषणादरम्यान माजी आमदाराला भोवळ आल्याची घटना घडली आहे. (Latest marathi news)

Chhagan Bhujbal। बिग ब्रेकिंग! छगन भुजबळांची लोकसभेतुन माघार

धाराशिवमध्ये अजित पवार गटाच्या प्रचारादरम्यान भाजपचे विधानपरिषदेचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर (Sujit Singh Thakur) यांना उष्माघाताचा त्रास झाला. अजित पवारांचं भाषण सुरू असताना सुजितसिंह ठाकूर चक्कर आली. त्यांना तातडीने कार्यकर्त्यांनी रुग्णालयामध्ये नेले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान ठाकूर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात.

Loksabha election । ठाकरे गटाला मोठा धक्का, निवडणुकीपूर्वीच बड्या नेत्याने केली राजकीय निवृत्तीची घोषणा

राज्यात सध्या लोकसभेचे वारे सुरु आहे. राजकीय नेते प्रचारासाठी आपापल्या मतदारसंघात सभा घेताना दिसत आहेत. पण राज्याच्या तापमानात खूप वाढ झाली आहे. याचा अनेकांना उष्मघाताचा फटका बसत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये ४२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. अशातच सुजितसिंह ठाकूर यांना देखील उन्हाचा फटका बसला.

Ajit Pawar । अजित पवारांना निवडणूक आयोगाचा मोठा दणका, ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी होणार चौकशी

Spread the love