Loksabha election । महाराष्ट्रात पाच टप्यात निवडणुका पार पडणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सर्व राजकीय पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. नेतेमंडळी ठिकठिकाणी सभा घेताना दिसत आहेत. पण लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha election 2024) भाजपच्या (BJP) अडचणी वाढताना दिसत आहेत. कारण बड्या नेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest marathi news)
Narayan Rane । नारायण राणे आहेत सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा वाचून डोळे फिरतील
भाजपच्या हैदराबादच्या उमेदवार के माधवी लता (K Madhavi Lata) यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हैदराबादमध्ये एमआयएमच्या ओवेसी बंधूंना माधीवी लता सतत आव्हान देत होत्या. त्यांनी रामनवमीच्या मिरवणुकीत हातवारे करत मशिदीकडे काल्पनिक बाण सोडण्याचा इशारा केला होता. या घटनेमुळे मुस्लिम समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत.
Car Accident । सर्वात मोठी बातमी! ठाकरे गटातील बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात
त्यामुळे माधवी लता यांच्यावर एफआयआर दाखल केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या प्रकरणी माधवी लता यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “जर मी मुस्लिमांच्या विरोधात असते तर रमजानच्या पवित्र महिन्यात हजरत अली साहिबच्या मिरवणुकीत का सहभागी झाली असती? गुन्हा दाखल करणे हे हास्यास्पद आहे. लोकांना मला टार्गेट करायचे आहे,” असा आरोप माधवी लता यांनी केला आहे.
Kolhapur News । गोळीबाराच्या घटनेने कोल्हापूर हादरलं! तरुणावर अंदाधुंद गोळीबार