Kolhapur News । गोळीबाराच्या घटनेने कोल्हापूर हादरलं! तरुणावर अंदाधुंद गोळीबार

Kolhapur News

Kolhapur News । कोल्हापूर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे (Crime) प्रमाण वाढू लागले आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणे हे प्रशासनापुढचे आव्हान बनले आहे. .मागील काही दिवसांपासून कोल्हापुरात (Crime in Kolhapur) टोळी युद्धाचा भडका उडाला असून अशातच आता कोल्हापूरमधून एक मोठी अपडेट समोर येत आहे. कोल्हापूरमधील जवाहरनगर परिसरात गोळीबाराची घटना घडली आहे. (Crime News)

Ajit Pawar । “…त्यांच्या घरी आयाबहिणी नाहीत काय?; उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं वक्तव्य

या घटनेमध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. रविवारी रात्रीच्या दरम्यान ही घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. माहितीनुसार, कोल्हापूर शहरातील जवाहर नगर येथे रविवारी रात्री यादव कॉलनी येथील एक युवक गंभीर जखमी झाला. तो जेवण करून रात्रीच्या वेळी बाहेर फिरायला गेला होता.

Viral Video । रील बनवताना मुलीने करोडोंच्या कारचे नुकसान केले… व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

त्यावेळी चारचाकीमधून आलेल्या अज्ञात आरोपींनी त्याच्या दिशेने गोळीबार केला. यात दोन राऊंड हवेत उडाले, तर एक गोळी युवकाच्या मांडीत घुसली. धक्कादायक बाब म्हणजे गोळीबारानंतर आरोपींनी कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने युवकाच्या डोक्यावर हल्ला केला. घटनेची माहीती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

Crime । गुन्हेगार महिलेसोबत लिफ्टमध्ये करू लागला जबरदस्ती; त्यानंतर गार्डने…

Spread the love