Ahmedabad Air India Plane Crash । अहमदाबाद विमान दुर्घटना : मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार 1.5 कोटींची नुकसानभरपाई; विमा कंपनीकडून 360 कोटींपर्यंत मदतीची शक्यता

Ahmedabad Air India Plane Crash

Ahmedabad Air India Plane Crash । अहमदाबाद विमानतळाजवळ घडलेल्या भीषण विमान दुर्घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. एअर इंडियाच्या बोईंग ड्रीमलायनर विमानाचा गुरुवारी दुपारी झालेल्या स्फोटात 239 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्सचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर टाटा समूह आणि एअर इंडिया यांनी पुढाकार घेत मृतांच्या कुटुंबीयांसाठी आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.

Narayan Rane । “मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो!” – नारायण राणेंची नितेश राणेंना थेट तंबी

टाटा समूहाने या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना 1 कोटी रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. तसेच जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च उचलण्याची जबाबदारीही टाटांनी स्वीकारली आहे. या व्यतिरिक्त, आंतरराष्ट्रीय “मॉन्ट्रियल कन्व्हेन्शन 1999” च्या नियमांनुसार, एअर इंडियाला प्रत्येकी 1.5 कोटी रुपये नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे.

प्रुडंट इन्शुरन्स ब्रोकर्सचे एव्हिएशन क्षेत्रातील तज्ज्ञ हितेश गिरोत्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण 360 कोटी रुपयांची भरपाई मृतांच्या कुटुंबीयांना दिली जाऊ शकते. यासाठी विमा कंपन्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

Sonam Raghuvanshi Case । हनीमूनच्या नावाखाली घात: नवविवाहितेचा कट उघड – मेघालयात नवऱ्याचा खून

एअर इंडियाने 1 एप्रिल रोजी टाटा AIG कडून 20 बिलियन डॉलर्स (सुमारे 1.71 लाख कोटी रुपये) विमा उतरवला होता. यामध्ये टाटा AIG, ICICI लोम्बार्ड, न्यू इंडिया इन्शुरन्स या कंपन्या सामील होत्या. विशेष म्हणजे, एअर इंडियाने ताफ्यातील 300 हून अधिक विमानांसाठी 30 लाख डॉलर्सचा प्रीमिअम भरला होता.

अपघातग्रस्त बोईंग ड्रीमलायनर विमानाचे वय आणि इतर घटक लक्षात घेता, त्याची विमा भरपाई 680 ते 980 कोटी रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या रकमेवरूनच मृतांच्या कुटुंबीयांना देण्यात येणारी भरपाई निश्चित होईल.

Bacchu Kadu । बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन तिव्र; प्रकृती चिंताजनक, राज्यभरात राजकीय हालचालींना वेग

Spread the love