Narayan Rane । मुंबई : महायुती आणि महाविकास आघाडीने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. महायुतीकडून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवर भाजप नेते नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच नारायण राणे हे लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला अर्ज दाखल केला. (Latest marathi news)
Car Accident । सर्वात मोठी बातमी! ठाकरे गटातील बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात
उमेदवारी अर्ज दाखल करताच राणे यांची 137 कोटींची संपत्ती (Property of Narayan Rane) असल्याचं समोर आलं आहे. राणे यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची 137 कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचं समोर आलं आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे राणे हे राज्यसभेसाठी सहा वर्षापूर्वी उमेदवारी दाखल करणाऱ्या सात उमेदवारांपैकी सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत.
Kolhapur News । गोळीबाराच्या घटनेने कोल्हापूर हादरलं! तरुणावर अंदाधुंद गोळीबार
शपथपत्रात जाहीर केलेल्या माहितीनुसार वार्षिक उत्पन्न मागील आर्थिक वर्षात 49 लाख 53 हजार 207 रुपये असून पत्नीचे वार्षिक उत्पन्न 87 लाख 73 हजार 883 रुपये इतके आहे. कौटुंबिक उत्पन्न 15 लाख 7 हजार 380 रुपये इतके आहे. नारायण राणे यांच्याकडे तब्बल एक कोटी 76 लाख 96 हजार 536 रुपयांचे 2552.25 ग्रॅम सोने, तर 78 लाख 85 हजार 371 रुपयांचे डायमंड आहेत. मागील सहा वर्षात त्यामध्ये 49 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
Ajit Pawar । “…त्यांच्या घरी आयाबहिणी नाहीत काय?; उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं वक्तव्य