Satara: प्री-वेडींग शूट करायचय? मग आता सातारा बनतंय प्री-वेडींग डेस्टीनेशनचे माहेरघर

Want to do a pre-wedding shoot? Now Satara is becoming the home of pre-wedding destination

सातारा: आता दिवाळीनंतर लग्नाचे मुहूर्त (Wedding time) निघतील. लोक आत्ता लग्न जमवून ठेवतात आणि दिवाळीत (Diwali) मुहूर्तावर लग्नाची तारीख ठरवतात. दरम्यान लग्नाचा मुहूर्त येईपर्यंत वर आणि वधू यांना बराच वेळ मिळतो. दरम्यान या शिल्लक काळात नवरा नवरी प्री-वेडींग फोटोशूट (Pre-wedding photo shoot) करण्याचे प्लॅन करतात. यावेळी नवरा नवरी प्री-वेडींग फोटोशूटसाठी कोणते लोकेशन असावे, तसेच कोणते चांगले स्पॉट आहे जिथं कमी खर्चात प्री-वेडींग फोटोशूट होईल हे गुगलवर सर्च करतात. दरम्यान तूम्हीही अशाच लोकेशनच्या शोधात असाल तर तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातील सातारा (Satara)शहराचा नक्की विचार करा.

शेतकऱ्यांसमोर नव संकट! ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर पडला खतांचा तुटवडा

हे आहे सातर शहराच वैशिष्टय

कृष्णा नदी व त्याच्या उपनदी, वेण्णा यांच्या संगमाजवळ वसलेला सातारा जिल्हा आहे. विशेष म्हणजे सातारा जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी लाभली आहे. इतकंच नाही तर साताऱ्यातील काही लोकेशन प्री-वेडींगसाठी प्रसिद्ध आहेत. मग यामध्ये महाबळेश्वर, ठोसेघर धबधबा, बामणोली डॅम, वाई, संगम माहुली अशी ठिकाणे आहेत जी तुम्हाला सहज परवडतील.

Ajit Pawar: अजित दादा फडणवीसांकडून घेणार हे ट्रेनिंग?, केली मिष्किल टिप्पणी

वाई : सातारा जिल्ह्यातील वाई येथे गणपतीच प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिराच वैशिष्टय अस आहे की,या मंदीराच्या परिसरातील कृष्णा नदीचा घाट प्रीवेडींगसाठी बेस्ट डेस्टीनेशन आहे.

महाबळेश्वर : हिलस्टेशन म्हणजे थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वर हे प्रसिद्ध आहे.दरम्यान हिवाळ्यात या ठिकाणी बर्फवृष्टी देखील होते.तसेच अलिकडच्या काळात महाबळेश्वर मध्ये प्री वेडींग फोटोशूट केले जात आहे.तसेच इथे अनेक पॉईंट, वेण्णा लेक तसेच हॉर्स रायडींग करत कपल्स फोटोशूट करतात.

संगम माहुली : सातारा जिल्ह्यात प्राचीन मंदिंरांची संख्या जास्त आहे. दरम्यान या मंदिरामधील संगममध्ये असलेल्या माहुली मंदिर प्राचिन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.या मंदिरात पारंपारिक वेशभुषेत अनेक लोक प्री वेडींग फोटोशुट करतात.

हातावर सूज आलीय? मग ‘या’ उपायांनी मिळेल आराम

ठोसेगर धबधबा : साताऱ्यात ठोसेगर धबधबा या ठिकाणी तुम्ही प्री वेडींग फोटो शुट करू शकता. या ठिकाणचं वैशिष्टय म्हणजे ठोसेघर धबधब्याच्या हिरव्यागार लोकेशनवर वेस्टर्न लुकमध्ये तुम्ही काढलेले फोटो अधिक खुलून दिसतात.

बामणोली लेक : सातारा जिल्ह्यातील बामणोली लेक परिसरात म्हणजेच मोठ तलाव आहे. दरम्यान या तलावात तुम्ही फोटो काढू शकता. इतकंच नाही तर रात्रीच्यावेळी तुम्ही टेंटमध्ये फोटोशुट करता येते.

Big Boss: येत्या 2 ऑक्टोबरपासून सुरू होणार ‘बिग बॉस’चा चौथा पर्वा, पहिल्या स्पर्धक जोडीचा बोल्ड डान्सचा व्हिडीओ समोर

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *