Monsoon Update । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मान्सूनसंदर्भात मोठी अपडेट समोर

Monsoon Update

Monsoon Update । महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कडक ऊन आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. मुंबई, ठाणे आणि राज्यातील इतर जिल्ह्यातील नागरिकांना कडाक्याच्या उन्हाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, हवामान खात्याने मान्सूनबाबत चांगली बातमी दिली आहे. यंदा नैऋत्य मान्सूनचे आगमन सुमारे तीन दिवस आधीच झाले आहे.

Kalyan Constituency । धक्कादायक! ‘वंचित’च्या पदाधिकाऱ्याला कार्यकर्त्यांकडूनच तुफान मारहाण

नैऋत्य मान्सूनने रविवारी (19 मे) देशाच्या दक्षिणेकडील निकोबार बेटांवर धडक दिली. खुद्द भारतीय हवामान विभागाने (IMD) याला दुजोरा दिला आहे. 2024 मध्ये सामान्य मान्सूनपेक्षा चांगला पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने आधीच वर्तवला आहे.

Loksabha Election । तरुणाने आठ वेळा केले मतदान, पोलिसांनी केली अटक; ‘या’ ठिकाणी होणार पुन्हा मतदान

मान्सून कधी येणार?

मान्सून महाराष्ट्रात कधी बरसेल याची संभाव्य तारीख हवामान खात्याने दिली आहे. हवामान खात्यानुसार, मान्सून वेळेवर किंवा त्याच्या काही दिवस आधी राज्यात दाखल होईल. 31 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याचे आयएमडीने म्हटले आहे. यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्याच्या सुमारास महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार असून, उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

Accident News । अतिशय भीषण अपघात! पाहा धक्कादायक व्हिडीओ

केरळमध्ये यंदा 31 मे च्या सुमारास मान्सूनचा पाऊस सुरू होईल, असा अंदाज IMD ने वर्तवला आहे. यानंतर, महाराष्ट्राच्या खालच्या कोकणात मान्सूनचे आगमन त्याच्या सामान्य तारखेच्या आसपास होईल. 11 जूनच्या सुमारास मुंबईत मान्सूनचे आगमन होणार आहे. तर दक्षिण महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची तारीख ५ जून आहे.

Eknath Shinde | एकनाथ शिंदेंबाबत शरद पवार यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

Spread the love