Manohar Nalge Death । शिवसेना (UBT) पोलिंग बूथ एजंट मनोहर नलगे (६२) हे मुंबईतील वरळी भागातील मतदान केंद्राच्या शौचालयात मृतावस्थेत आढळून आले. मुंबईतील एनएम जोशी मार्ग पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. ADR मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली आहे.
Devendra Fadnavis । पुण्यात बिल्डरच्या मुलाने दोघांना चिरडलं, देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडवर; थेट..
मिळालेल्या माहितीनुसार, मनोहर नलगे हे ६२ वर्षांचे असून ते म्हसकर उद्यान, बीडीडी चाळ, ना एम जोशी मार्ग, डेलिसल रोड, मुंबई-१३ येथील रहिवासी होते. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सोमवारी राज्यभरात 13 जागांवर मतदान झाले. मतदानाच्या या शेवटच्या टप्प्यात देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान झाले. याशिवाय पाचव्या टप्प्यातील ईव्हीएममधील बिघाड, पक्ष कार्यकर्त्यांमधील हाणामारी आणि मतदान केंद्रांवर सुविधांचा अभाव यामुळे ते चर्चेत राहिले.
Monsoon Update । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मान्सूनसंदर्भात मोठी अपडेट समोर
पोलिसांनी सांगितले की, वॉशरूममध्ये जाण्यापूर्वी त्यांनी अस्वस्थतेची तक्रार केली होती. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, “मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पोस्टमॉर्टम केले जात आहे.” शिवसेना (UBT) कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगावर शहरातील मतदान केंद्रांवर योग्य सुविधा न पुरवल्याचा आरोप केला आहे.
HSC 12th Result 2024 । ब्रेकिंग! उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल; या लिंकवर येईल पाहता