Pune Accident । पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट

Pune Accident

Pune Accident । पुण्यात एका अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात असलेल्या पोर्श कारने मोटारसायकलला धडक दिल्याच्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. त्या रात्री आरोपी मुलाने मित्रांसोबत दोन ठिकाणी दारू प्यायल्याचे सांगितले जात आहे. एवढेच नाही तर चार कोटी रुपये किमतीच्या पोर्श कारची नोंदणीही नव्हती आणि गाडीवर नंबर प्लेटही नव्हती.

Devendra Fadnavis । पुण्यात बिल्डरच्या मुलाने दोघांना चिरडलं, देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडवर; थेट..

हे प्रकरण सध्या फक्त पुण्यातच नव्हे तर राज्यभरात चर्चेत आहे. आरोपी मुलाला अवघ्या काही तासांतच जामीन मिळाल्याने देखील मोठा संताप व्यक्त होत आहे. दरम्यान आता त्या मुलाने एक मोठी कबुली दिली आहे त्यामुळे त्याचे वडील गोत्यात सापडले आहेत.

Monsoon Update । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मान्सूनसंदर्भात मोठी अपडेट समोर

आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ” अल्पवयीन मुलाला त्याच्या वडिलांनीच पार्टीसाठी परवानगी दिली होती. मी कार चालविण्याचे रीतसर प्रशिक्षण घेतलेले नाही, वाहन चालविण्याचा परवानाही (licence) नाही, तरी वडिलांनीच त्यांच्या मालकीची ग्रे रंगाची पोर्श कार माझ्याकडे दिली. मी मद्यप्राशन करतो हे वडिलांना माहिती आहे”, असं आरोपीने पोलिसांना सांगितले यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

HSC 12th Result 2024 । ब्रेकिंग! उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल; या लिंकवर येईल पाहता

Spread the love