Viral Video । महिलेने गळा दाबून मुलीला केली बेदम मारहाण; भयानक व्हिडिओ समोर

Viral video

Viral Video । X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक आई आपल्या मुलीला बेदम मारहाण करताना दिसत आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ गुजरातमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ अनेक पत्रकार आणि वापरकर्त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये एक महिला स्वतःला मुलीची आई म्हणवताना दिसत आहे आणि व्हिडिओमध्ये ती मुलीला बेदम मारहाण करताना दिसत आहे.

Nashik Politics । नाशिक मध्ये रात्रीस खेळ चाले, नुसता पैशांचा पाऊस…धक्कादायक व्हिडीओ समोर

तिथे एक छोटी मुलगी मदतीसाठी ओरडत आहे, आश्चर्य म्हणजे ती चिमुरडीचा गळा दाबण्याचाही प्रयत्न करते. असे ती एकदा नाही तर अनेक वेळा करते. नंतर ती मुलीला दुसऱ्या खोलीत घेऊन जाते. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला आपल्या मुलीला कशी बेदम मारहाण करत आहे, हे दिसत आहे. अशा स्थितीत मुलगी जोरजोरात रडून तिच्या वडिलांना मदतीसाठी हाक मारते, मात्र तिने मदतीसाठी हाक मारताच ही क्रूर महिला तिच्यावर पुन्हा हल्ला करते.

Beed Lok Sabha Election | ब्रेकिंग! शरद पवारांच्या सहकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी; राजकीय वर्तुळात खळबळ

व्हिडिओमध्ये मुलगी रडताना दिसत आहे. महिलेचाही मुलीचा गळा दाबण्याचा प्रयत्न होत आहे. दरम्यान, मूल गप्प बसत नाही, तेव्हा महिलेने तिला क्रूरपणे उचलून खाली फेकले. क्रूरतेचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ahmdnagar Lok Sabha । अहमदनगरच्या राजकारणात मोठी खळबळ! सुजय विखे अन् लंकेंचे कार्यकर्ते मध्यरात्री भिडले; रस्त्यावर पडली पैशाची बॅग, व्हिडीओ व्हायरल

Spread the love