Nilesh Lanke । निलेश लंके यांनी शेअर केला पुन्हा एक धक्कादायक व्हिडीओ

Nilesh Lanke

Nilesh Lanke । राज्यात आज लोकसभा निवडणुकीत चौथा टप्पा पार पडत आहे. या चौथ्या टप्प्यात अहमदनगर लोकसभा मतदार संघ चांगलाच चर्चेत आहे. दरम्यान निवडणुकीच्या आदल्या रात्री सुजय विखे पाटील यांनी मतदारांवर पैशांचा पाऊस पडल्याचा आरोप निलेश लंके यांनी केला आहे. मात्र आता पुन्हा एकदा अहमदनगर लोकसभा मतदार संघात आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. निलेश लंके यांनी पुन्हा एक धक्कादायक व्हिडीओ शेअर केला आहे.

Nashik Politics । नाशिक मध्ये रात्रीस खेळ चाले, नुसता पैशांचा पाऊस…धक्कादायक व्हिडीओ समोर

भाजपने निवडणूक आयोगाला हाताशी धरून मतदान केंद्रावर प्रचार केल्याचा गंभीर आरोप निलेश लंके यांनी केला आहे. यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. यासंदर्भातील व्हिडीओ देखील लंके यांनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाथर्डी तालुक्यातील घुमटवाडीतील केंद्राचा व्हिडीओ असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Ahmdnagar Lok Sabha । अहमदनगरच्या राजकारणात मोठी खळबळ! सुजय विखे अन् लंकेंचे कार्यकर्ते मध्यरात्री भिडले; रस्त्यावर पडली पैशाची बॅग, व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओ शेअर करत निलेश लंके यांनी लिहिले की, “असे असेल तर प्रशासनाचाही भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून घ्या!
घुमटवाडी, ता.पाथर्डी, जि.अहिल्यानगर येथे भाजपा उमेदवारांनी आपल्या तालुक्यातील अधिकाऱ्यांना हाताशी धरुन मतदान केंद्रावर आपल्यालाच मतदान कसे होईल या अनुषंगाने मतदान केंद्रावर स्वतःच्या प्रचाराचे व चिन्हाचे प्रदर्शन केले आहे!” सध्या त्यांचे हे ट्विट खूप चर्चेत आहे.

Spread the love