Beed Lok Sabha Election | ब्रेकिंग! शरद पवारांच्या सहकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी; राजकीय वर्तुळात खळबळ

Sharad Pawar

Beed Lok Sabha Election | सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. बीडच्या राजकारणातून सध्या एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शरद पवार गटातील ज्येष्ठ नेते फुलचंद कराड यांना मोबाईलवरुन शिवीगाळ करत थेट जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Politics News । सर्वात मोठी बातमी! निवडणुकीच्या काळात भाजपचा काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याने सोडली साथ

मागच्या काही दिवसापासून नेत्यांना धमकी देण्याचे प्रमाण वाढत आहे. सध्या देखील निवडणुकीच्या काळात फुलचंद कराड यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. माहितीनुसार, फुलचंद कराड हे या लोकसभा निवडणुकीमध्ये सक्रिय होते. = शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास आपल्या कार्यालयात कार्यकारीणीची बैठक घेत होते. याच क्षणी त्यांना फोन आला व शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

Devendra Fadnavis । ब्रेकिंग! देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंबाबतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

धमकीनंतयर त्यांनी तक्रार दाखल केली मात्र तरीदेखील त्यांना वारंवार धमकीचे फोन येत होते. एवढंच नाही तर, रात्री दीड वाजता थेट त्यांच्या घरासमोर काही व्यक्ती तोंडाला रुमाल बांधून घराचे दार वाजवून ‘बाहेर ये’ असं म्हणत होते. या सर्व प्रकरणामुळे आता बीडमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

Nagpur Viral Video । मुलीला शाळेतून घरी घेऊन जात असताना ऑटोचालकाचे तिच्याशी गैरवर्तन, व्हिडिओ झाला व्हायरल अन् मग पोलिसांनी

Spread the love