Devendr Fadanvis । देवेंद्र फडणवीस यांना सर्वात मोठा धक्का! विद्यमान खासदाराने केला ठाकरे गटात प्रवेश

Devendr Fadanvis

Devendr Fadanvis । जळगावचे भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil) यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवबंधन बांधून उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. भाजपने उमेदवारी न दिल्याने ते पक्षामध्ये नाराज होते आणि त्यांनी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला. त्याच्याबरोबर पारोळ्याचे भाजपचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी देखील ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Ravindra Dhangekar । पुण्यात होणार तिहेरी लढत! रवींद्र धंगेकरांनी दिली वसंत मोरेंच्या उमेदवारीवर प्रतिक्रिया; म्हणाले…

उन्मेष पाटील यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, आदि बडे नेते उपस्थित होते. उन्मेष पाटलांच्या या पक्षप्रवेशामुळे भाजपसाठी जळगावमध्ये मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे भाजपचे जळगाव लोकसभेचे गणित बिघडण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.

Accident News । नमाज अदा करून येणाऱ्या तरूणाचा भीषण अपघात! ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत जागीच ठार

जळगाव या ठिकाणी महाविकास आघाडीचा एकही विद्यमान आमदार नाही. त्याचबरोबर ठाकरे गटाचे जे तीन आमदार होते ते शिंदे गटात असल्याने लोकसभेची लढत आता रंगतदार होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर उन्मेष पाटील यांना शिवसेना ठाकरे गटाकडून जळगाव लोकसभेची उमेदवारी देखील मिळण्याची शक्यता आहे.

Eknath Shinde । एकनाथ शिंदे यांना पुन्हा मोठा धक्का बसणार, बडा नेता ठाकरेंच्या गळाला

Spread the love