Eknath Khadse । भाजप प्रवेशाच्या चर्चांनावर एकनाथ खडसे यांचा सर्वात मोठा खुलासा; म्हणाले, “एका दिवसात…”

Eknath Khadse

Eknath Khadse । मागच्या काही दिवसापासून एकनाथ खडसे हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. यामुळे अनेक तर्कवितर्क देखील लावले जात आहेत. नुकतेच एकनाथ खडसे दिल्लीला गेले यावरून ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांनी अधिकच जोर धरला. दरम्यान आता या चर्चांबद्दल एकनाथ खडसे यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

Ravindra Dhangekar । पुण्यात होणार तिहेरी लढत! रवींद्र धंगेकरांनी दिली वसंत मोरेंच्या उमेदवारीवर प्रतिक्रिया; म्हणाले…

दिल्लीहून परतताच एकनाथ खडसे यांनी या सर्व चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, “पक्ष बदलण्याचा निर्णय एका दिवसात, एका क्षणात होत नसतो. कार्यकर्त्यांना, सहकाऱ्यांना विश्वासात घेऊनच असे निर्णय होत असतात. त्यामुळे अशी कुठलीही प्रक्रिया मी आतापर्यंत केलेली नाही.” असं खडसे यांनी म्हटलं आहे.

Accident News । नमाज अदा करून येणाऱ्या तरूणाचा भीषण अपघात! ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत जागीच ठार

माझ्या एका केसची सुप्रीम कोर्टाची तारीख असल्याने मी दिल्लीला गेलो होतो असं स्पष्टीकरण एकनाथ खडसे यांनी चर्चांवर दिलं आहे. त्याचबरोबर आता या सर्व प्रश्नांना मला पूर्णविराम द्यावासा वाटतो. असं देखील ते म्हणाले आहेत. दिल्लीला गेल्यावर अनेकांशी भेटी गाठी होत असतात. या भेटीगाठी नेहमीच होत असतात. असं देखील त्यांनी म्हंटल आहे.

Eknath Shinde । एकनाथ शिंदे यांना पुन्हा मोठा धक्का बसणार, बडा नेता ठाकरेंच्या गळाला

Spread the love