Ravindra Dhangekar । पुण्यात होणार तिहेरी लढत! रवींद्र धंगेकरांनी दिली वसंत मोरेंच्या उमेदवारीवर प्रतिक्रिया; म्हणाले…

Ravindra Dhangekar

Ravindra Dhangekar । मागील काही दिवसांपूर्वी वसंत मोरे (Vasant More) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकला. आता वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पुण्यात आता काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) विरुद्ध वसंत मोरे अशी तिहेरी लढत होणार आहे. यावर रवींद्र धंगेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Latest marathi news)

Accident News । नमाज अदा करून येणाऱ्या तरूणाचा भीषण अपघात! ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत जागीच ठार

“ही निवडणूक पुणेकर लढणार असून पुणेकरच जिंकणार आहे. लोकशाहीत कोणीही कुठूनही निवडणूक लढू शकतो, तो त्याचा संविधानिक अधिकार असून जो उमेदवार लोकशाहीसाठी लढेल, लोक केवळ त्यालाच मतदान करतील. ते अनेक पक्षातील नेत्यांना भेटले. जरी ते कोणत्याही पक्षात गेले तरी ते निवडणूक लढवणारच होते. डोकं शांत ठेवा,” असा सल्ला रविंद्र धंगेकर यांनी दिला आहे. (Vasant More vs Ravindra Dhangekar)

Eknath Shinde । एकनाथ शिंदे यांना पुन्हा मोठा धक्का बसणार, बडा नेता ठाकरेंच्या गळाला

“मी पुणेकरांचा उमेदवार असून मागील अनेक वर्ष पुणेकरांनी मला आशीर्वाद दिला आहे. मी माझ्या पुण्यासाठी मतदान मागणार असून मतदार सुज्ञ आहेत ते योग्य व्यक्तीला मतदान करतील. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता इंडिया आघाडीला पुणेकर मतदान करतील. लोकशाहीसाठी नागरिक इंडिया आघाडीच्या मागे उभे राहतील, असा विश्वास देखील रविंद्र धंगेकर यांनी व्यक्त केला.

Nilesh Lanke । निलेश लंके यांना उमेदवारी का दिली? राधाकृष्ण विखे पाटील यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

Spread the love