Accident News । नमाज अदा करून येणाऱ्या तरूणाचा भीषण अपघात! ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत जागीच ठार

Accident News

Accident News । बीड : दररोज कुठे ना कुठे अपघाताच्या (Accident) घटना घडत असतात. या अपघातात अनेकांचा नाहक बळी जातो. अनेक अपघात हे वाहनचालकांच्या चुकीमुळे होत असतात. सध्या असाच एक भीषण अपघात झाला आहे. नमाज अदा करून येणाऱ्या तरूणाची ट्रकला धडक बसली. ही धडक इतकी जोरात होती की यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. (Accident in Beed)

Nilesh Lanke । निलेश लंके यांना उमेदवारी का दिली? राधाकृष्ण विखे पाटील यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

याबाबत अधिक माहिती अशी की, बीडच्या गेवराई तालुक्यात असणाऱ्या तलवाडा गावात एक घटना घडली आहे. नमाज पठण करून गावाकडे निघालेल्या तरुणाच्या दुचाकीला ट्रकने जोरात (Truck bike accident) धडक दिली. या धडकेत जबर मार लागल्याने तरुण जागीच ठार झाला. युनूस शेख (वय 32, रा. बणेवाडी ता. गेवराई) असं या तरुणाचं नाव आहे. (Truck bike accident in Beed)

Rashmi Barve । लोकसभेपूर्वीच काँग्रेसला धक्क्यांवर धक्के! अर्जानंतर बड्या नेत्याचे जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द

अपघातानंतर ट्रक चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण जमावाने त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या भीषण अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून आहे. या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास बीड पोलीस पुढील तपास करत आहेत.

Unmesh Patil । राजकीय हालचालींना वेग! उन्मेश पाटलांच्या ठाकरे गटातील प्रवेशापूर्वी ‘त्या’ बॅनरवरून चर्चांना उधाण

Spread the love