
Jalna News । जालना : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघालं आहे. आंदोलनकर्त्यांकडून सरकार आणि पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. (Jalna Protest) पोलिसांनी लाठीचार्ज करून खूप मोठी चूक केली आहे, त्याचे त्यांना वाईट परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे. या घटनेच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्रात बंदची हाक पुकारण्यात आली आहे. (Latest Marathi News)
Crime News । धक्कदायक! उपचाराच्या नावाखाली डॉक्टरचे तरुणीसोबत नको ते कृत्य
जालन्यातील मराठा समाजाचे आंदोलन अमानुष पद्धतीने मोडून काढण्याचा राज्य सरकारच्या कृतीचा निषेध करत सरकारने आंदोलनकर्त्यांचा अंत पाहू नये असा इशारा विरोधी पक्षांकडून देण्यात आला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे गेले होते. त्यावेळी त्यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
अज्ञात लोकांकडून डीवायएसपी सिध्देश्वर भोरे यांच्या सरकारी वाहनावर दगडफेक करण्यात आली आहे. परंतु वाढता जमाव पाहता पोलिसांनी तेथून वेळीच काढता पाय घेतला. त्यामुळे खूप मोठा अनिर्थ टळला आहे. यावरून काल झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर अद्याप परिस्थिती नियंत्रणात आली नसल्याचे पाहायला मिळत आहे.