SSC Constable Bharti 2023 । बारावीनंतर सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी! पोलिसात बंपर भरती, मिळेल 70 हजार पगार

A golden opportunity to get a government job after 12th! Bumper recruitment in police, will get 70 thousand salary

SSC Constable Bharti 2023 । राज्यात मोठ्या प्रमाणावर स्पर्धा परीक्षांची (Competitive Examinations) तयारी केली जाते. अनेकांना पहिल्याच प्रयत्नात यश मिळते. परंतु अनेकांना खूप प्रयत्न करूनही यश मिळत नाही. अशातच जर तुम्ही कॉन्स्टेबल भरतीची तयारी करत असाल तर आता तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी असून कर्मचारी निवड आयोगाने दिल्ली पोलिसांमध्ये कॉन्स्टेबल (Delhi Police Constable) भरतीसाठी अर्ज सुरू केलेत. (Latest Marathi News)

Gold Silver Rate । ग्राहकांना फटका! सोने-चांदीच्या किमतीत कमालीची वाढ, जाणून घ्या नवीनतम दर

या पदांसाठी होईल भरती

कॉन्स्टेबल (कार्यकारी) पुरुष (माजी सैनिक कमांडो (पॅरा-3.1) च्या 337 पदे (अनुशेष अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसह) भरली जाणार आहेत. तर कॉन्स्टेबल (कार्यकारी) महिलांसाठी 2491 पदे आहेत. स्टाफ सिलेक्शन कमिशन दिल्ली पोलिसांमध्ये कॉन्स्टेबल (कार्यकारी) पुरुष आणि महिलांच्या 7547 पदे भरली जाणार आहेत. कॉन्स्टेबल (कार्यकारी) पुरुषांसाठी 4453 पदे, कॉन्स्टेबल (कार्यकारी) पुरुष (माजी सैनिक (इतर) (अनुशेष अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसह) ची 266 पदे भरली जाणार आहेत.

Maratha Andolan । मराठ्यांवर गोळी घालायची असेल तर पहिली गोळी माझ्यावर घाला – छत्रपती संभाजीराजे

पात्रता आणि फी

ऑनलाईन परीक्षेनंतर उमेदवारांची निवड करण्यात येईल. उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून 10+2 (वरिष्ठ माध्यमिक) उत्तीर्ण असावा. सेवारत, सेवानिवृत्त किंवा दिवंगत दिल्ली पोलिस कर्मचारी/दिल्ली पोलिसांचे मल्टी-टास्किंग कर्मचारी तसेच बॅंड्समन, बगलर्स यांचे मुलगे/मुलींना 11वी पासपर्यंतच्या पात्रतेमध्ये सवलत दिली आहे. (Delhi Police Constable Application)

Delhi Crime । राजधानी दिल्ली हादरली! तरुणाने वृद्ध महिलेवर अत्याचार करून कापले ओठ

अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 100 रुपये शुल्क जमा करावे लागणार आहेत. तर आरक्षणासाठी पात्र असणाऱ्या म्हणजे अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि माजी सैनिक (ESM) उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सवलत दिली आहे. (Delhi Police Constable Application Fee)

Rain in Maharashtra । राज्यात पावसाचे दमदार आगमन, ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस

अशाप्रकारे करा अर्ज

  • अर्ज करण्यासाठी तुम्हाला ssc.nic.in या वेबसाइटवर जावे लागेल.
  • आता होमपेजवर दिल्ली पोलिस परीक्षा-2023 मधील कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव्ह) पुरुष आणि महिला यांच्या माहितीवर क्लिक करा.
  • लॉगिन तपशील भरून सबमिट वर क्लिक करा.
  • संपूर्ण अर्ज भरल्यानंतर तुम्हाला फी भरावी लागणार आहे.
  • यानंतर तुमचा फॉर्म भरण्यात येईल.

गर्भवती महिलेला निर्वस्त्र करून नवऱ्याने संपूर्ण गावभर फिरवले; कुटुंबातील लोक काढत होते व्हिडिओ, घटना वाचून अंगावर येईल काटा

Spread the love