
Sonam Raghuvanshi Case । इंदूरच्या एका नवविवाहित तरुणाचा मेघालयातील एका निर्जन दरीत मृतदेह आढळून आल्यानंतर उलगडलेला गुन्हा सध्या देशभरात खळबळ उडवत आहे. अवघ्या 12 दिवसांपूर्वी विवाहबद्ध झालेले राजा आणि सोनम रघुवंशी हे जोडपं हनिमूनसाठी मेघालयला गेले होते. मात्र, राजा रघुवंशीचा मृतदेह 2 जून रोजी सोहरा परिसरातील विसावाडोंग धबधब्याजवळील खोल नाल्यात सापडल्याने सर्वत्र संशयाचं वातावरण निर्माण झालं.
Bacchu Kadu । बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन तिव्र; प्रकृती चिंताजनक, राज्यभरात राजकीय हालचालींना वेग
तपास अधिक खोलात गेल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली – ही हत्या त्याच्या पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने केली होती. सोनम रघुवंशीने तिचा प्रियकर राज कुशवाह आणि त्याचे तीन साथीदार – विशाल ठाकूर, आकाश आणि आनंद – यांच्यासह हा कट आखला होता. विशालने पहिला हल्ला केला आणि त्यानंतर राजा रघुवंशीचा मृतदेह दरीत फेकला.
या प्रकरणात पोलिसांनी आरोपींच्या विरोधात महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. विशाल ठाकूरने हल्ल्यावेळी वापरलेले कपडे त्याच्या घरी आढळून आले असून, त्यावर रक्ताचे डाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या रक्ताचे नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
Rain Update : मुंबईकरांनो, सावध! पुढील ३ तास अत्यंत महत्त्वाचे – हवामान विभागाचा रेड अलर्ट
राजा आणि सोनम यांच्या वैवाहिक जीवनात इतक्या लवकर झालेल्या या भयंकर घटनेमागे प्रेमसंबंध, धोका आणि सूडाची मालिका उभी आहे. सोनम आणि राज कुशवाह यांची ओळख इंदूरमधील एका प्लायवूड फॅक्टरीत झाली होती आणि हा संबंध विवाहानंतरही सुरू राहिला.
सध्या आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना शिलाँग न्यायालयात हजर केलं जाणार आहे. या गुन्ह्यातील अनेक तपशील अजूनही स्पष्ट व्हायचे असून, पोलिसांकडून मोबाईल कॉल रेकॉर्ड्स, लोकेशन डिटेल्स आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू आहे.