Political News । नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) दोन गट पडल्यापासून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पक्षावर आणि पक्षाच्या चिन्हावर दावा केला आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या पक्षात फूट पडली नसल्याचे सांगत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाला आहे. (Latest Marathi News)
Jalna News । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांची तोडफोड
परंतु प्रत्यक्षात मात्र काहीसे वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. खरी राष्ट्रवादी अजित पवार गटाची की शरद पवार गटाची? याबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाने अजूनही दिला नाही. यावर आता अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे. “30 सप्टेंबरनंतर सुनावणी होईल, आमच्याकडे बहुमत असल्याने आम्हाला चिन्ह मिळेल,” असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे.
Crime News । धक्कदायक! उपचाराच्या नावाखाली डॉक्टरचे तरुणीसोबत नको ते कृत्य
आमची स्पष्ट भूमिका आहे. तिन्ही पक्षात एकमत आहे. जेव्हा तीन पक्ष एकत्र येतात तेव्हा काही अडचणी येतात. मात्र त्यावर उपायदेखील शोधून काढला जातो. आम्हाला सत्तेत योग्य तो हिस्सा मिळणार आहे. काही आमदार कमकुवत आहेत, असा दाखवण्याचा विरोधी पक्षांचा प्रयत्न सुरु आहे. परंतु आमचे सर्व आमदार ताकतवर आहेत, असे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले.