Pune Koyta Gang । पुण्यात कोयता गॅंगचा पुन्हा धुमाकूळ! 5 रिक्षा, 15 ते 20 दुचाकी, कारची केली तोडफोड

Pune Koyta Gang । पुणे : मागील काही दिवसापासून पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण हे वाढतच चालले आहे. दररोज पुणे शहरात हे मोठ मोठे गुन्हे घडत आहेत. वाढती गुन्हेगारी दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. अशातच गेल्या काही दिवसापासून पुण्यात कोयता गॅंग चांगलीच सक्रिय झाली आहे. ही गॅंग (Koyta Gang) गाड्यांची तोडफोड तसेच लोकांना हाणामारी करत आहे. (Pune Koyta Gang News)

Bajarang Sonwane । “…नाहीतर ‘त्या’ कॅसेट निवडणूक आयोगाकडे देईल,” बजरंग सोनवणे यांचा धनंजय मुंडेंना इशारा

सध्या देखील कोयता गॅंगने पुन्हा एकदा पुण्यात धुमाकूळ घातला आहे. काल रात्री 11 च्या दरम्यान पुण्यातील बिबवेवाडी सुपर परिसरात 10 ते 15 गुंडानी 5 रिक्षा, 15 ते 20 दुचाकी आणि एका कारवर कोयत्याने वार करत वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करून, दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

Maharashtra politics । भाजपला पुन्हा मोठा धक्का! चार नगरसेवक काँग्रेसच्या बंडखोर उमेदवारासोबत

धक्कादायक बाब म्हणजे या घटनेत मुलांचा समावेश होता. हातात कोयते घेऊन काही मुलांनी गाड्यांची तोडफोड केली. यामुळे केल्याने नागरिक चांगलेच भयभीत झाले आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मागील काही दिवसांपासुन या भागातील महिला लहान मुले आणि नागरिक प्रचंड दहशतीत आहेत. पोलिसांना देखील कोयता गॅंगचा बंदोबस्त करता आला नाही.

Fire News । धक्कादायक! कापसाच्या गोडाऊनसह केमिकल कंपनीला लागली भीषण आग

Spread the love