Nasim Khan । निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का! स्टार प्रचारकाने दिला राजीनामा

Nasim Khan

Nasim Khan । मुंबई : आगामी निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Elections) तोंडावर सर्व राजकीय पक्ष जोरात तयारी करत आहेत. राज्यात दोन मोठ्या पक्षात फूट पडल्याने यंदाची निवडणूक अटीतटीची असणार आहे. निवडणूका तोंडावर असताना काँग्रेसला सतत धक्क्यांवर धक्के बसत आहेत. अशातच पुन्हा एकदा काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. (Latest marathi news)

Pune Koyta Gang । पुण्यात कोयता गॅंगचा पुन्हा धुमाकूळ! 5 रिक्षा, 15 ते 20 दुचाकी, कारची केली तोडफोड

मुंबई काँग्रेसचे नेते मोहम्मद आरीफ ऊर्फ नसीम खान यांनी आपल्या स्टार प्रचारकपदाचा राजीनामा दिला आहे. ते आता उरलेल्या लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यांसाठी स्टार प्रचारक म्हणून काम करणार नाहीत. नसीम खान यांनी आपला राजीनामा पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्याकडं सोपवला आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

Bajarang Sonwane । “…नाहीतर ‘त्या’ कॅसेट निवडणूक आयोगाकडे देईल,” बजरंग सोनवणे यांचा धनंजय मुंडेंना इशारा

नसीम खान हे मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक होते. पण त्यांना पक्षानं संधी दिली नाही. विशेष म्हणजे नसीम खान हे चारदा राज्यात मंत्री आणि आमदार राहिले आहेत. “पक्षानं राज्यात एकही मुस्लिम उमेदवार न देण्याचा अयोग्य निर्णय घेतल्यानं मी अस्वस्थ झालो आहे. म्हणून मी माझ्या स्टार प्रचारकपदाचा राजीनामा देत आहे,” अशी प्रतिक्रिया नसीम खान यांनी दिली आहे.

Maharashtra politics । भाजपला पुन्हा मोठा धक्का! चार नगरसेवक काँग्रेसच्या बंडखोर उमेदवारासोबत

Spread the love