Bajarang Sonwane । महाविकास आघाडीने बजरंग सोनवणे यांना बीड लोकसभा मतदारसंघातून (Beed Lok Sabha Constituency) उमेदवारी दिली आहे. तर महायुतीकडून भाजप नेत्या पकंजा मुंडे (Pakanja Munde) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या अटीतटीच्या लढतीत कोणाचा विजय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अशातच आता मंत्री धनंजय मुंडेंना (Dhananjay Munde) बजरंग सोनवणे यांनी गंभीर इशारा दिला आहे.
Maharashtra politics । भाजपला पुन्हा मोठा धक्का! चार नगरसेवक काँग्रेसच्या बंडखोर उमेदवारासोबत
वडवणी तालुक्यातल्या कोठारबन येथे बजरंग सोनवणे यांनी सभा घेतली. यावेळी ते म्हणाले की, “धनंजय मुंडे मला बहुरंगी म्हणतात. पण त्यांचा बहुरंगी पणा संपूर्ण राज्याने पाहिला आहे. मी रंगात रंग मिसळणारा बजरंग आहे. दोन्ही बहीण भावाने माझ्यावर टीका करण्यापेक्षा बीड जिल्ह्याच्या विकासावर बोलावं,” असे आव्हान बजरंग सोनवणे यांनी दिले आहे.
Fire News । धक्कादायक! कापसाच्या गोडाऊनसह केमिकल कंपनीला लागली भीषण आग
“धनंजय मुंडे फोनवर लोकांना एकेरी भाषेत कशा शिव्या देतात, याच्या माझ्याकडे चार कॅसेट असल्याने त्यांनी माझ्यावर टीका करू नये. नाहीतर मी निवडणूक आयोगाकडे या कॅसेट सादर करील,” असा गंभीर इशाराच बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडे यांना दिला आहे. बजरंग सोनवणे यांच्या इशाऱ्यावर आता धनंजय मुंडे कशाप्रकारे प्रत्युत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Ajit Pawar । अजित पवारांना मोठा दिलासा! निवडणूक आयोगाची ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी क्लिन चीट