Maharashtra politics । भाजपला पुन्हा मोठा धक्का! चार नगरसेवक काँग्रेसच्या बंडखोर उमेदवारासोबत

Maharashtra politics । सांगली : आज लोकसभेच्या (Loksabha election) दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडणार असून महाराष्ट्रातील ८ मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर अनेक राजकीय नेते पक्षाने उमेदवारी नाकारल्याने दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. अशातच आता राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांच्यासाठी भाजपच्या (BJP) चार नगरसेवकांनी पक्ष सोडला आहे.

Fire News । धक्कादायक! कापसाच्या गोडाऊनसह केमिकल कंपनीला लागली भीषण आग

नुकताच भाजपच्या नगरसेवकांनी विशाल पाटलांच्या प्रचारामध्ये सहभाग घेतला होता. त्यामुळे भाजपकडून संबंधित चार नगरसेवकांवर कारवाईचा प्रस्ताव प्रदेश कार्यालयाकडे पाठवला होता. पण कारवाईपूर्वीच भाजपचे बंडखोर नगरसेवक निरंजना आवटी, संदीप आवटे, आनंदा देव माने आणि शिवाजी दुर्वे यांनी आपल्या भाजपच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

Ajit Pawar । अजित पवारांना मोठा दिलासा! निवडणूक आयोगाची ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी क्लिन चीट

“माझी उमेदवारी कोणत्या स्वार्थासाठी नसून मी केलेले बंड हे स्वतःसाठी केलं नाही. माझं बंड पक्षासाठी केले आहे. पक्षाचे विचार जिवंत राहिले पाहिजे, आपला उद्देश आहे. माझ्या कुटुंबाचे काँग्रेस पक्षासाठी योगदान पाहता काँग्रेस पक्ष माझ्यावर कारवाई करेल असे मला वाटत नाही,” असेही विशाल पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.

Madha Lok Sabha । माढ्यात भाजपची नवी चाल, उत्तम जानकरांना मोठा धक्का

Spread the love