Fire News । धक्कादायक! कापसाच्या गोडाऊनसह केमिकल कंपनीला लागली भीषण आग

Fire News । छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात मध्यरात्रीच्या दरम्यान दाेन आगीच्या (Fire) घटना घडल्या आहेत. या आगीमुळे घटनास्थळी असणाऱ्या मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या पथकाकडून आग आटोक्यात आली आहे. (Fire in Chhatrapati Sambhajinagar)

Ajit Pawar । अजित पवारांना मोठा दिलासा! निवडणूक आयोगाची ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी क्लिन चीट

मध्यरात्रीच्या सुमारास पैठण तालुक्यातील विहामांडवा येथे मार्केट यार्ड मध्ये कापसाच्या गोडाऊनला भीषण आग (Cotton godown fire) लागली. या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे पैठणच्या सत्यहरी केमिकल कंपनीला आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Madha Lok Sabha । माढ्यात भाजपची नवी चाल, उत्तम जानकरांना मोठा धक्का

याबाबत कंपनी व्यवस्थापनाकडून माहिती देण्यात आली आहे. जरी अग्निशमन दलाच्या पथकाला दोन्ही आग आटोक्यात आणण्यात आल्या असल्या तरी ही आग कशामुळे लागली हे अजून स्पष्ट झाले नाही. आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली याचा उलगडा पोलीस करत आहेत.

Accident News । कार आणि दुचाकीचा भीषण अपघात! बहीण-भावाचा जागीच मृत्यू

Spread the love