Accident News । कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात! सणासुदीच्या काळात ६ जिवलग मित्रांवर काळाची झडप

Accident News

Accident News । अपघाताचे प्रमाण अजूनही कमी झाले नाही. अनेक भीषण अपघात घडल्याचे आपण पाहत असतो. यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात. अपघातामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होतात. काहीजण जाणूनबुजून वाहतुकीचे नियम मोडतात आणि अपघात होतो. देशात सध्या सणासुदीचा हंगाम सुरु आहे. सर्वत्र जल्लोष सुरु आहे. परंतु अपघातात ६ जिवलग मित्र जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

Supriya Sule । शरद पवार आणि अजित पवार आतून एकत्र आहेत का? सुप्रिया सुळे म्हणाल्या…

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेशमधील (UP Accident News) मुझफ्फरनगर परिसरात ही घटना घडली आहे. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त ६ तरुण बाहेर फिरण्यासाठी चालले होते. यावेळी दिल्ली-डेहराडून महामार्गावर छपरजवळ असताना त्यांच्या कारने समोरून जात असणाऱ्या ट्रकला पाठीमागून धडक (UP Accident) दिली. कारचे (Car Accident) नियंत्रण सुटून ही धडक बसली. ही धडक इतकी जोरात होती की या तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

Accident News । अतिशय भीषण अपघात! 100 गाड्या एकमेकांवर धडकल्या

माहितीनुसार, तरुण मुझफ्फरनगर जिल्ह्यातील शाहदरा परिसरात राहत होते. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात इतका भीषण होता की कारमध्ये मृतदेह अडकून पडले होते. कटरच्या मदतीने दरवाजा कापून मृतदेह बाहेर काढले. ऐन सणासुदीच्या काळात ६ जिवलग मित्रांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Rahul Narvekar । आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांचं मोठं वक्तव्य

Spread the love