Rahul Narvekar । मागच्या अनेक दिवसापासून शिवसेनेच्या १६ आमदार अपात्र प्रकरणाचा मुद्दा चर्चेत आहे. अनेक दिवस झाले असूनही अजून देखील आमदार अपात्रतेबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे शिवसेनेच्या १६ आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबर पर्यंत द्या असे निर्देश सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले आहेत. त्यामुळे आता आमदार अपात्र प्रकरणात नेमका काय निर्णय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यामध्येच आता राहुल नार्वेकर यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी बोलताना एक मोठ वक्तव्य केले आहे. ज्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्यात राजकीय फटाके फुटायला वेळ आहे. लोकशाहीत बहुमत महत्त्वाचं असतं. असं मोठं वक्तव्य राहुल नार्वेकर यांनी केले आहे. सध्या त्यांच्या वक्तव्याची सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे.
काय म्हणाले राहुल नार्वेकर?
माध्यमांशी बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले, “मी संविधानाला आणि घटनेला धरूनच काम करणार तसेच आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय घेणार असे राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे. लोकशाहीत बहुमत हे महत्त्वाचं असतं त्यामुळे सद्य परिस्थितीत संविधानातील कायदे आणि नियमांचे पालन केले जाईल आणि कायद्याला धरून असणारा निकाल जाईल निकाल दिला जाईल असे देखील राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.
Sharad Pawar । शरद पवार मराठा की ओबीसी?, शाळा सोडल्याचा दाखला सोशल मीडियावर व्हायरल