Accident News । पंजाबमधील खन्ना जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली. अनेक वाहने एकमेकांवर आदळल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली-अमृतसर राष्ट्रीय महामार्गावर सकाळी भीषण अपघात झाला आहे. या कालावधीत सुमारे 100 वाहनांचे नुकसान झाले आहे. अनेक वाहनांची मोडतोड झाली. या अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
Rahul Narvekar । आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांचं मोठं वक्तव्य
जखमी लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमींवर उपचार सुरु आहेत. या अपघातात पंजाब रोडवेजच्या बसचाही (Punjab Accident News) समावेश आहे. मोठ्या प्रमाणात वाहने आदळल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी खराब झालेली वाहने एका बाजूला काढून वाहतूक सुरू केली. या अपघातात जीवितहानीबरोबरच मोठ्या प्रमाणात आर्थिक हानीही झाली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, सुमारे 20-25 किलोमीटर अंतरावर वाहने एकमेकांवर आदळली. धुक्यामुळे समोरचं दिसत नसल्याने मागून येणाऱ्या गाड्या धडाधड एकमेकांवर आदळल्या आणि हा भीषण अपघात झाला.