Sharad Pawar । कथित व्हायरल जात प्रमाणपत्रावर शरद पवारांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, “माझी जात सर्वांना…”

Sharad Pawar

Sharad Pawar । राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी ओबीसी जातीचा दाखल घेतला आहे, असा दावा काहींनी सोशल मीडिया वरून केला होता. या संदर्भातचा एक दाखला देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत होता. दरम्यान या प्रकरणावर खुद्द शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज गोविंदबाग या ठिकाणी पवार कुटुंबीयांकडून दिवाळी पाडवा साजरा करण्यात आला आहे. यावेळी शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत घेतली आणि याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

Accident News । कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात! सणासुदीच्या काळात ६ जिवलग मित्रांवर काळाची झडप

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, जन्माने दिलेली जात मी लपवू शकत नाही. सगळ्या जगाला माहिती आहे माझी जात काय आहे. असं शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. त्याचबरोबर यावेळी शरद पवार यांनी राज्यातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील भाष्य केले आहे. याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, मराठा तरुणांच्या भावनात तीव्र आहेत त्यामुळे मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही लोकांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू आहे. असं म्हणत शरद पवार यांनी मराठा समाजाला आरक्षणाबाबत एक प्रकारे आश्वासन दिले.

Supriya Sule । शरद पवार आणि अजित पवार आतून एकत्र आहेत का? सुप्रिया सुळे म्हणाल्या…

त्याचबरोबर मराठा ओबीसी समाजामध्ये वाद नाही मात्र काही लोकांकडून जाणून बुजून असं वादाचा वातावरण निर्माण केल्याचा प्रयत्न केला जात आहे, असे देखील शरद पवार यांनी यावेळी म्हटले आहे.

Accident News । अतिशय भीषण अपघात! 100 गाड्या एकमेकांवर धडकल्या

Spread the love