
Supriya Sule । अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत बंडखोरी केल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) गट आणि शरद पवार (Sharad Pawar) असे दोन गट पडले. यानंतर या दोन्ही गटांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली. मात्र फूट पडली असली तरी देखील उद्योजक प्रतापराव पवार (Prataprao Pawar) यांच्या घरी पवार कुटुंब एकत्र आल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरद पवारांबरोबरच्या भेटीनंतर अजित पवार दिल्लीला अमित शहा यांची भेट घेण्यासाठी गेले. यामुळे पवार काका-पुतणे हे दोघेही एकमेकांचे विरोधक असले तरी ते आतून एकत्र आहेत असे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. आता यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
Accident News । अतिशय भीषण अपघात! 100 गाड्या एकमेकांवर धडकल्या
याबाबत बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाले की, मी राजकारण आणि समाजकारण शरद पवार व यशवंतराव चव्हाण यांच्या संस्काराने करते. यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार शरद पवार यांच्यावर झाले तेच संस्कार माझ्यावर देखील झालेत. आपण मराठी माणसं फार सुसंस्कृत असतो आपली लढाई वैचारिक आहे वैयक्तिक नाही. असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
Rahul Narvekar । आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांचं मोठं वक्तव्य
त्याचबरोबर, पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आमच्यासाठी तरी ही लोकशाही आहे. वैचारिक लढाई आणि प्रेमाची नाती, मैत्री वेगळी. प्रमोद महाजन हे भाजपमध्ये होते मात्र शरद पवार यांचे आजही महाजन कुटुंबाशी ऋणानुबंध आहेत. प्रमोद महाजन नसले तरी त्यांच्याबद्दल आजही माझ्या मनात प्रेमच आहे. आणि ते कायम राहील. त्याचबरोबर मुंडे कुटुंब आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या कुटुंबाबद्दलही तेच आहे असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.
social media video । व्हिडिओ शेअर करणाऱ्यांनो सावधान! बनावट असल्यास जावे लागणार तुरुंगात; जाणून घ्या कायदा