Supriya Sule । सुप्रिया सुळेंनी सरकारकडे केली मोठी मागणी; म्हणाल्या, “ससूनभोवती दाटलेले संशयाचे धुके…”

Supriya Sule

Supriya Sule । सध्या पुण्यात चांगलीच खळबळ माजली आहे. पुणे कार अपघात प्रकरणी ससून रुग्णालय देखील चर्चेत आलंय. याच ठिकाणी आरोपी अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी फेरफार केल्याचा आरोप करण्यात येत आहे. आता याबाबत सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत मागणी केली आहे. ससून रुग्णालयाभोवती दाटलेले संशयाचे धुके काढून टाकण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मोठी मागणी सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे.

Pune Accident । सर्वात मोठी बातमी! अल्पवयीन मुलाचा रक्ताचा रिपोर्ट बदलणारा मास्टरमाईंड कोण? पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर

सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत लिहिले की, “पुणे जिल्हा आणि परिसरातील गोरगरीब रुग्णांना उत्कृष्ट वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात ससून रुग्णालयाने सिंहाचा वाटा उचलला आहे. परंतु गेली काही दिवसांपासून या रुग्णालयाबाबत सातत्याने तक्रारी येत आहेत. काही दिवसांपूर्वी ड्रग तस्कर ललित पाटील प्रकरणी हे रुग्णालय चर्चेच्या केंद्रस्थानी होते. तर आता कल्याणीनगर ‘हिट ॲन्ड रन’ प्रकरणी आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्याचे प्रकरण चर्चेत आहे. याप्रकरणी दोन वरीष्ठ डॉक्टरांना अटक देखील करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणामुळे ससूनची प्रतिमा काही प्रमाणात डागाळली. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज असून दोषी व्यक्तींना कठोर शासन व्हायला हवे”.

Raj Thackeray । भाजपला राज ठाकरे यांनी दिला सर्वात मोठा धक्का!

वास्तविक पाहता ससून रुग्णालय हे उत्कृष्ट रुग्णसेवेसाठी ओळखले जाते. कोरोना काळात देखील येथे उत्तम सेवा उपलब्ध झाली होती. ससूनमध्ये तज्ज्ञ, अभ्यासू आणि अनुभवी डॉक्टर्स आहेत. त्यांच्या माध्यमातून उत्तम दर्जाचे उपचार गरजू व गरीब रुग्णांना मिळतात. याखेरीज परिचारिका व सपोर्टींग स्टाफचे देखील सहकार्य लाभते.शिवाय अनेक नामांकित डॉक्टर येथून शिकून गेले आहेत. परंतु गेल्या काही दिवसांच्या घटनाक्रमानंतर आणि डॉक्टरांच्या अटकेनंतर त्यांच्यावर देखील शंका घेतली जात आहे.

Devendra Fadnavis । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सर्वात मोठा दावा, म्हणाले, ‘भाजप सर्वात मोठा पक्ष, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत…’

काही लोकांनी गैरकृत्य केले असेल तर त्यामुळे इतरांकडेही संशयाने पाहिले जाणे योग्य नाही. तसेच रुग्णसेवेच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असणारी शासकीय संस्था अशाप्रकारे संशयाच्या भोवऱ्यात अडकणे हे चांगले लक्षण नाही. म्हणूनच रुग्णालय प्रशासनाच्या एकंदर कामकाजाची समिक्षा होणे आवश्यक आहे. माझी शासनाकडे मागणी आहे की, आपण ससूनच्या गेल्या पाच वर्षांच्या कामकाजाबाबत श्वेतपत्रिका काढून ससूनभोवती दाटलेले संशयाचे धुके काढून टाकण्यासाठी उपाययोजना करावी. असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

Politics News । राजकारणातून मोठी बातमी! अजित पवार गट आणि भाजपमध्ये बिनसलं?

Spread the love