Ajit Pawar । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वेर साखर कारखान्याची पुन्हा एकदा चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राज्याच्या लाचलूचपत विभागाकडून ही चौकशी सुरू करण्यात आली आहे. यामुळे अजित पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, साताऱ्यातील अजित पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वर कारखान्यातील कथित गैरव्यवहार कोरेगाव येथील एक भूखंड आणि बिसलरी प्रकरण संदर्भात ही चौकशी सुरू आहे. याआधी देखील या कारखान्याची चौकशी करून चार्जशीट दाखल करत त्यामधून अजित पवार यांचे नाव वगळलं होतं. मात्र आता एसीबीकडून त्याची पुन्हा एकदा चौकशी केली जात आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
Raj Thackeray । भाजपला राज ठाकरे यांनी दिला सर्वात मोठा धक्का!
आमदार शलिनीताई पाटील हा जरंडेश्वेरकारखाना चालवत होत्या. हा कारखाना कर्जात बुडाला होता मात्र त्या कारखान्याला वाचवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले मात्र त्यांच्या प्रयत्नांना फळ मिळाले नाही. नंतर हा कारखाना लिलाव प्रक्रियेत गुरु कमोडिटी या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने खरेदी केला. अजित पवार यांच्याशी संबंधित व्यक्तीने हा कारखाना खरेदी केल्याची माहिती आहे.
यानंतर शालिनीताई पाटील यांनी जरंडेश्वेर लिलाव प्रक्रिया बोगस असल्याचा गंभीर आरोप केला होता त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण न्यायालयात गेलं हायकोर्टाने याबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. यानंतर गुन्हे शाखा मुंबई यांच्याकडे गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली.
Politics News । राजकारणातून मोठी बातमी! अजित पवार गट आणि भाजपमध्ये बिनसलं?