Pune Accident । सर्वात मोठी बातमी! अल्पवयीन मुलाचा रक्ताचा रिपोर्ट बदलणारा मास्टरमाईंड कोण? पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर

Pune Accident

Pune Accident । महाराष्ट्रातील पुणे पोर्श कार अपघातातील अल्पवयीन आरोपींबाबत मोठा खुलासा झाला आहे. पुणे पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी केवळ पैसे घेऊन अल्पवयीन मुलाचा रक्ताचा अहवालच बदलला नाही, तर लाचेच्या बदल्यात त्यांनी वडील आणि आजोबांना वैद्यकीय समस्या उद्भवणार नाही, असे वचन दिले होते. त्यांनी शारिरीक तपासणीत आरोपीला क्लीनही दिले होते. रविवारी (19 मे) भरधाव वेगात आलेल्या पोर्श कारने दुचाकीस्वाराला मागून धडक दिली, यात दोन अभियंत्यांचा मृत्यू झाला.

Raj Thackeray । भाजपला राज ठाकरे यांनी दिला सर्वात मोठा धक्का!

अल्पवयीन आरोपीचे ब्लड बदलल्या प्रकरणी पोलिसांनी दोन डॉक्टरांना अटक केली आहे. सध्या या डॉक्टरांची चौकशी सुरु आहे. दरम्यान आता या मागील मास्टरमाइंड कोण याबाबत माहिती समोर आली आहे. ब्लडचा नमुना बसलल्याचा मास्टरमाइंड हा डॉ. अजय तावरे हाच होता अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

Devendra Fadnavis । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सर्वात मोठा दावा, म्हणाले, ‘भाजप सर्वात मोठा पक्ष, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत…’

ससून रुग्णालयातील आणखी एका कर्मचाऱ्याला अटक

दुसरीकडे, या प्रकरणी पुणे गुन्हे शाखेने ससून रुग्णालयातील आणखी एका कर्मचाऱ्याला अटक केली असून, अमित घाटकांबळे असे त्याचे नाव आहे. तो ससून हॉस्पिटलमध्ये शिपाई म्हणून काम करतो, त्याने 3 लाख रुपयांची लाच घेऊन एका डॉक्टरला दिल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच मुळात एका व्यक्तीकडून दुसऱ्याला देण्यासाठी लाचेचे पैसे घेण्याचे काम केले.

Politics News । राजकारणातून मोठी बातमी! अजित पवार गट आणि भाजपमध्ये बिनसलं?

Spread the love