Pune Porsche Accident । पुणे अपघात प्रकरणात सर्वात मोठी बातमी समोर!

Pune Accident

Pune Porsche Accident । पुणे पोर्श कार अपघातातील अल्पवयीन आरोपींबाबत मोठा खुलासा झाला आहे. पुणे पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी केवळ पैसे घेऊन अल्पवयीन मुलाचा रक्ताचा अहवालच बदलला नाही, तर लाचेच्या बदल्यात त्यांनी वडील आणि आजोबांना वैद्यकीय समस्या उद्भवणार नाही, असे वचन दिले होते. त्यांनी शारिरीक तपासणीत आरोपीला क्लीनही दिले होते. रविवारी (19 मे) भरधाव वेगात आलेल्या पोर्श कारने दुचाकीस्वाराला मागून धडक दिली, यात दोन अभियंत्यांचा मृत्यू झाला.

Supriya Sule । सुप्रिया सुळेंनी सरकारकडे केली मोठी मागणी; म्हणाल्या, “ससूनभोवती दाटलेले संशयाचे धुके…”

सध्या या प्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचं ब्लड सॅम्पल (Blood Sample) बदलणाऱ्या तीन जणांचे निलंबन करण्यात आले आहे. माहितीनुसार, ससून रुग्णालयाचे (Sassoon Hospital) डॉक्टर अजय तावरे आणि श्रीहरी हरनोळसह शिपाई अतुल घटकांबळेवर यांचे निलंबन करण्यात आले आहे.

Ajit Pawar । अजित पवार यांना सर्वात मोठा धक्का!

अजय तावरेंच्या सांगण्यावरून हरनोळ आणि घटकांबळेंनं आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याचं धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्याचा कटाचा मास्टरमाईंड ससूनचा डॉक्टर तावरेच असल्याचं समोर आलंय. सध्या या तिन्ही जणांचं निलंबन करण्यात आले आहे.

Ajit Pawar । ब्रेकिंग! पुणे अपघात प्रकरणी अजित पवार यांच्यावर अतिशय गंभीर आरोप; नार्को टेस्ट करण्याची मागणी

Spread the love