Supriya Sule । “… त्यांना शरद पवारांना संपवायचंय”, सुप्रिया सुळे यांचा गंभीर आरोप

Supriya Sule

Supriya Sule । पुणे : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्व राजकीय पक्षांनी प्रचारला जोरात सुरुवात केली आहे. यंदा संपूर्ण राज्याचे लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघाकडे (Baramati Lok Sabha Constituency) लक्ष लागले आहे. कारण या मतदारसंघाला पवार घराण्यामधला संघर्ष पाहायला मिळणार आहे. एका प्रचारसभेदरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर (BJP) गंभीर आरोप केला आहे. (Latest marathi news)

Maharashtra Politics । ब्रेकिंग! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्वात मोठा धक्का

नुकतीच सुप्रिया सुळे यांनी पुण्याच्या भोर तालुक्यातील गावभेट दौऱ्यादरम्यान किकवी गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. “त्यांची संपवायची भाषा आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) बारामतीला येऊन बोलले होते आम्हाला शरद पवार (Sharad Pawar) यांना संपवायचं आहे. मग विकासाचं कायं झालं? का तो रस्त्यातचं उतरला गाडीतून. माझ्याविरोधात सगळे एकवटले असून आता त्यांचं एकचं लक्ष आहे आणि ते म्हणजे शरद पवार यांना संपवायचं”, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.

Sharad Pawar । सूनेबद्दल शरद पवारांचे ‘ते’ वक्तव्य अन् पेटली नव्या वादाची ठिणगी

“भ्रष्टाचारमुक्त भारत करेन म्हणून त्यांना या देशाने निवडून दिल आहे. पण पुढे कायं झालं? अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी पर्लिमेंटमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि भाजप नेते अशोक चव्हाण या दोन लोकांवर आरोप केले होते. आज अशोक चव्हाण भाजपमध्ये असून अरविंद केजरीवाल जेलमध्ये आहेत. आदर्श शिक्षक, आदर्श आई हे ऐकलं होतं. घोटाळ्यातला आदर्श पहिल्यांदा ऐकला,” असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

Viral News । 14 वर्षाच्या मुलाने गिळले नाणे, त्याची अवस्था पाहून डॉक्टरांनाही बसला धक्का

Spread the love