Sharad Pawar । सूनेबद्दल शरद पवारांचे ‘ते’ वक्तव्य अन् पेटली नव्या वादाची ठिणगी

Sharad Pawar

Sharad Pawar । राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काही जागांचा तिढा कायम आहे. सर्व पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रचार सभेदरम्यान, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. खासदार शरद पवार यांनी पहिल्यांदाच सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यावर निशाणा साधला होता, त्यावरून आता वाद पेटला आहे. (Sharad Pawar on Sunetra Pawar)

Viral News । 14 वर्षाच्या मुलाने गिळले नाणे, त्याची अवस्था पाहून डॉक्टरांनाही बसला धक्का

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामती लोकसभा मतदार संघातील प्रचारात मुलीऐवजी यंदा सुनेला निवडून द्या, असं मतदारांना आवाहन केलं होतं. यानंतर शरद पवारांनीही अजित पवार चुकीचं बोलले नाही. मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार यांच्यात फरक आहे, असा टोला लगावला. शरद पवारांच्या या टीकेचा भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी समाचार घेतला आहे.

Crime News । सोशल मीडियावरची मैत्री पडली महागात! हॉटेलमध्ये नेत तरुणीवर….

“पवार साहेबांना आपण सगळेच पुरोगामी विचाराचे नेते म्हणून ओळखतो. दुसऱ्याची लेक 40 वर्ष पवार परिवारात वावरत असली तरी ती पवार साहेबांच्या लेखी परक्याची आहे, पवारांची नाही. कधीच मुलगा आणि मुलीमध्ये भेदभाव न करणाऱ्या पवार साहेबांनी काल सून आणि मुलगी यात फरक केला,” अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

Kirit Somayya | किरीट सोमय्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने तोंड दाखवायला जागा राहिली नाही; बड्या नेत्याची टीका

Spread the love