Sayaji Shinde । शस्त्रक्रियेनंतर सयाजी शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले; “पुढील दहा वर्ष मी…”

Sayaji Shinde

Sayaji Shinde । नुकतेच प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया (Sayaji Shinde’s heart surgery) पार पडली. सयाजी शिंदेंच्या एका रक्त वाहिनीमध्ये ब्लॉक सापडला होता. त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. चाहत्यांनी देखील त्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली होती. अशातच आता सयाजी शिंदे यांनी एक व्हिडीओ शेअर करुन तब्येतीबाबत माहिती दिली आहे. (Latest marathi news)

“नमस्कार, मी एकदम व्यवस्थित आहे, माझ्यावर प्रेम करणारे सर्व रसिक, माझे हितचिंतक सर्वांच्या शुभेच्छा माझ्यासोबत असतात, आता काळजी करण्यासारखं काही नाही. खबरदारी म्हणून मी चेक अप करुन घेतल आहे. त्यात एक ब्लॉकेज आढळलं. पण ते सहज निघालं आहे. लवकरच तुमच्या मनोरंजनासाठी उपस्थित राहीन,” अशा आशयाचे कॅप्शन देत सयाजी शिंदेनी एक व्हिडिओ (Sayaji Shinde Video) शेअर केला आहे.

Supriya Sule । “… त्यांना शरद पवारांना संपवायचंय”, सुप्रिया सुळे यांचा गंभीर आरोप

“पुढील दहा वर्ष मी अजून चांगलं काम करणार असून मी पुन्हा आपल्या सेवेत असेल. मी इन्स्टाग्रामला असेल, यूट्यूबला असेन. आपली मजा-मस्ती सुरु राहिलं. काळजी करु नका मी आनंदी आणि मजेत आहे. तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद.” अशी प्रतिक्रिया सयाजी शिंदेनी दिली आहे. यावर चाहत्यांनीदेखील प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Maharashtra Politics । ब्रेकिंग! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्वात मोठा धक्का

Spread the love